पुणे (ऑनलाईन हवेलीनामा) खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकास यश आले असून यात दोघांना अटक केली आहे त्यापैकी एक खुनाच्या गुन्ह्याची जन्मठेपेची शिक्षा झालेल्या परंतु सध्या पॅरोलवर बाहेर असलेल्या गुन्हेगाराचा समावेश आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस स्टेशन परिक्षेत्रात अक्षय कवडे या तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता त्या संदर्भात गुन्हे शाखेचे युनिट ६ चे पथक तपास करत होते यासंदर्भात पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की या हल्ल्यातील गुन्हेगार लोणीकंद येथील सरडेमळा येथे येणार आहेत याची कल्पना पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिली व त्यांच्या सूचनेनुसार त्याठिकाणी सापळा रचून संतोष उर्फ गट्टया तुकाराम आव्हाळे व नवनाथ गावडे यांना ताब्यात घेतले.यावर संतोष आव्हाळे याच्याकडे अधिक चौकशी केली असता अक्षय कवडे यास जुन्या भांडणाच्या कारणावरून नवनाथ गावडे याचा मदतीने कोयत्याने मारहाण केल्याचा मान्य केले.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन शिंदे, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकाटे, संजीव कळंबे, कानिफनाथ कारखेले, प्रतीक लोहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, सचीन पवार, शेखर काटे ,नितीन घाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.
