पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) सैनिक भरतीसाठी केवळ सहा जागांसाठी तब्बल सहाशेच्यावर विद्यार्थी हजारो किलोमीटर चा प्रवास करून प्रवेशासाठी पोहोचले परंतु तेथे त्यांची कोरोना चाचणी करून त्यातील जवळपास सत्तर ते ऐशी विद्यार्थ्यांना रुग्णालयात विलगिकरण करून ठेवण्यात आले त्यांची यादरम्यान मोठी गैरसोय होत असून वेळेवर जेवणही मिळत नसल्याचे सांगितले जाते तर थंडीमुळेही प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना महामारीच्या प्रभाव इतका भयानक रूप धारण करेल अशी कल्पना नव्हती अनेक तरुण बेकार झाले कौशल्य असूनही संधी मिळत नाहीत त्यामुळे हा तरुण सैरभैर झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे याचीच प्रचिती म्हणजे आसाम राज्यात महाराष्ट्रातील तरुणांसाठी सहा सैनिक भरती प्रक्रिया सुरू होती यासाठी थोडे नाही तर जवळपास सहाशेच्या वर तरुण आसाममध्ये दाखल झाले तेही राज्याच्या सर्व भागातील होते यात काही जण भरती प्रक्रियेत पोहोचले तर काहींची कोरोनाची अँटिजन चाचणी करण्यात आली त्यानंतर त्यातील काहींना रुग्णालयात विलगिकरण कक्षात भरती करण्यात आले तेथे प्रचंड थंडी व वेळेवर न मिळणारे जेवण यामुळे या युवकाचे हाल होत आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून मदतीसाठी विनंती केली आहे
यातील एकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांचा मोबाईल क्रमांक समाज माध्यमातून शोधून त्यांना मदतीसाठी आवाहन केले त्यावर त्यांनी गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबद्दल माहिती देऊन मदतीसाठी प्रयत्न चालू केले आहेत लवकरच त्यांना ही मदत मिळेल असे रुपाली पाटील यांनी सांगितले.
