पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) देशात दहशतवाद्यांचे नेटवर्क पुन्हा कार्यरत होत असल्याचे दिसून येत आहे आज दिल्लीतील गाजीपुर येथे फुलबाजार मुख्य प्रवेश दरवाजा जवळ बेवारस पडलेल्या बॅगेत आय ई डी ही स्फोटके आढळली असून वेळीच ती नाकाम  केल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती.

          दहशतवाद्यांनी पुन्हा सॉफ्ट टार्गेट करण्याचे मनसुबे दर्शवलेले असून नुकत्याच एका माहितीनुसार मुंबईवर ड्रोन हल्ले होणार असल्याची बातचीत डार्क वेबसाइटवरून झाल्याचे दिसून आले त्यानंतर आज राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गाजीपुर येथे आय ए डी स्पोर्ट का ने भरलेली बॅग सापडली यामुळे मोठा घातपात होणार होता तो बॉम्ब विरोधी पथकाने निष्क्रिय केल्याने मोठी मनुष्यहानी टळली
        यावर तपास यंत्रणा कामाला लागली असून लवकरच याची अधिक माहिती समोर येईल. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *