पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने आता शासकीय कार्यालयात परवानगीशिवाय नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही तसेच नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आज सूचित केले आहे

      कोरोना रुग्णाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच असल्याने सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात पूर्व परवानगी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही तसेच संबंधित कार्यालयीन अधिकाऱ्यांनी नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारेच संवाद साधावा आशा सूचना पारित केल्या आहेत.
        सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पण कमी करावी कामाच्या वेळेत बदल करण्यात याव्यात असे सांगितले आहे तसेच कोरोना नियंत्रणात मनुष्यबळाची कमतरता भासल्यास शासकीय अनुदानित कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात येईल असे स्पष्ट केले
        हॉटेलमध्ये ,मॉलमध्ये तसेच दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक असल्याचे सांगितले यात कोणी डोस व्यतिरिक्त आढळून आला तर ते अस्थपणे शील करण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *