पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथे सहारा दूध डेअरीत कामगारांच्या हलगर्जीपणामुळे उकळते पाणी अंगावर पडल्याने चार कामगार भाजले असल्याची घटना घडली असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे
      दूध डेअरीच्या बॉयलरची साप सफाई करताना सुरक्षेच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने चार कामगारांच्या अंगावर बाॕयलरचे गरम पाणी पडल्याने भाजले होते साफसपाई करताना केलेला निष्काळजीपणा या कामगारांच्या जीवावर बेतला असून यात चार जण गंभीर भाजले असून  एक जणांचा मृत्यु झाला त्यामुळे  पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे यात मुकेश रामलाई कश्यप (वय ३०) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर सोनू श्रीप्रभूदयाल कश्यप (वय२५), राहुल संतोष कुमार माथूर (वय१८), इसाक अकबर कोतवाल (वय ४५) हे कामगार या घटनेत गंभीर जखमी आहेत.दूध डेअरी मधील बॉयलरची सफाई करताना बाळगलेली हलगर्जी कामगारांच्या जीवावर बेतली आहे. बॉयलरमधील उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे चौघे कामगार भाजले होते.नेमकं काय घडलं?
ही घटना खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथे असलेल्या सहारा दूध डेअरी या ठिकाणी घडली आहे. दूध डेअरी मधील बॉयलरची सफाई करताना बाळगलेली हलगर्जी कामगारांच्या जीवावर बेतली आहे. बॉयलरमधील उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे चौघे कामगार भाजले होते.
      या प्रकरणी सहारा दूध डेअरी येथील ऑपरेटर अब्दुल गफार, अब्दुल रशीद मुल्ला आणि व्यवस्थापक मोहितकुमार राजबहादूर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनी या बाबत फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *