पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) विद्यापीठ सुधारणा कायदा नुकताच विधानसभेत पारित केला यास विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र विरोध केला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून यावर आवाज उठवणार असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले होते याचाच एक भाग म्हणून भारतीय युवा मोर्चा यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १० लाख पत्रे पाठवणार असून याची सुरुवात आज करण्यात आली राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून ही पत्रे पाठवली जाणार आहेत
नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महा विकास आघाडीने अतिशय घाईगडबडीत विद्यापीठ सुधारणा कायदा हे विधेयक पारित केले यानुसार विद्यापीठातील कोणत्याही निर्णयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या परवानगीची आवश्यकता असणार आहे त्यामुळे भविष्यात ही विद्यापीठे राजकारण्यांचा अड्डा बनणार त्यांची स्वायत्तता पूर्णपणे नष्ट होणार त्यामुळे यास विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध केला तरीही हे विधेयक बहुमताच्या जोरावर पारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे संपूर्ण राज्यात या विधेयकाविरोधात आवाज उठविण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले यानुसार आज पासून भारतीय युवा मोर्चा यांनी मुख्यमंत्री यांना या विधेयकास विरोध दर्शविण्यासाठी पत्रे पाठवणार असल्याचे जाहीर केले संपूर्ण राज्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत ही पत्रे मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली जाणार आहे
