पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून याची चाचपणी करण्यासाठी जिल्हा काँग्रेस अध्यक्षांकडे इच्छुकांची चाचपणी करण्यासंदर्भात पत्र पाठवले असल्याची माहिती मिळाली असून महानगरपालिका क्षेत्रामध्येही इच्छुक उमेदवारांची यादी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्या संदर्भात त्यांनी भाष्य केले
राज्यात महा विकास आघाडी चे सरकार असून यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले असले तरी त्यांच्यातील अंतर्गत गटबाजी अनेक वेळा उघड झालेली आहे त्यामुळे सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर राज्यात काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पाठवले यांच्यासारख्या उमद्या अध्यक्षांकडून पक्षबांधणी चे काम चालू असून त्यांनी संपर्क वाढवला आहे लवकरच राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार असून महा विकास आघाडी ही एकत्र निवडणूक लढवणार की स्वबळावर हे घटक पक्ष निवडणूक लढणार यासाठी कालावधी लागणार आहे तरीही काँग्रेसने स्वबळावर लढण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे
स्थानिक पातळीवर अनेकवेळा महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांसमोर येत असल्याचे दिसून येतात त्यामुळे स्थानिक प्रश्न वेगळे असल्याने स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला काँग्रेसने सुरुवात केली आहे
