पुणे- (हवेलीनामा आॕनलाईन) लातूर-अंबाजोगाई महामार्गावर ट्रक व एस टी बसमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर १५ जण जखमी झाले आहे मिळलेल्या माहितीनुसार, लातूर औरंगाबाद ही एस टी बस लातूरमधून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या जवळ असलेल्या वळणावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही परंतु हा अपघात इतका भीषण होता की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे १५ गंभीर जखमी झाले आहेत.आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला अंबाजोगाई लातूर रोडवर बर्दापूर फाट्याजवळ नंदगोपाल डेअरीजवळ लातूर – औरंगाबाद बसची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले असून अपघातातील जखमींना बर्दापूर आणि ‘स्वाराती’ रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
