थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे या पिता पुत्रांची भेट व्हावी यासाठी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने ह भ प बाजीराव महाराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शिवनेरी गड पासून पुरंदर गड असा पालखी सोहळा काढला जातो या पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र थेऊर येथे आगमन झाले त्यावेळी ग्रामस्थांनी या सोहळ्याचे अतिशय उत्साहात स्वागत केले

         छत्रपती शिवाजी राजे व शंभुराजे यांची महाराजांच्या आजारपणाच्या काळात भेट होऊ नये यासाठी काही जणांनी प्रयत्न केले त्यामुळे महाराजांच्या मृत्यू समयी शंभुराजे त्यांना भेटू शकले नाहीत स्वराज्याची सूत्रे अश्या समयी त्यांच्याकडे देण्याचा महाराजांचा हेतू होता परंतु भेट  झाली नाही.  ही उणीव भरून काढण्यासाठी स्वराज्य संघ गेली काही वर्षांपासून छत्रपती यांचे जन्म ठिकाण शिवनेरी गड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांना पालखीत घेऊन छत्रपती संभाजी राजे यांचे जन्म स्थान असलेल्या पुरंदर गड पर्यंत जातात हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र थेऊर येथे गुरुवारी रात्री मुक्कामी पोहोचला त्यावेळी थेऊर येथील मान्यवरांनी या सोहळ्याचे भव्य स्वागत केले.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती घेण्यात आली.
           यामध्ये महाराष्ट्र राज्य साखर संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर, दत्तात्रय कुंजीर,गावच्या सरपंच  शीतल काकडे, ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, संजय काकडे, संतोष काकडे, मुंबई महापौर केसरी दत्तात्रय उर्फ आबा काळे,संजय कुंजीर, गोरक्षनाथ काळे, रुपचंद बोडके,माजी उपसरपंच विलास कुंजीर, एकनाथ काळे ,  चिंतामणी भजनी मंडळाचे सर्व सभासद,  आनंद तांबे, अमीर बडदे, दशरथ कुंजीर,बाळासाहेब शेडगे,  स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
          आज सकाळी हा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला यावेळी गावातील भजनी मंडळी यांनी हरिनामाच्या गजरात या सोहळ्याला निरोप दिला त्यावेळी मार्गात रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *