लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन)   स्वराज्य संघ यांच्या वतीने शिवनेरी गड ते पुरंदर गड असा छत्रपती शिवाजी राजे पालखी सोहळा आयोजित केलेला आहे तो थेऊर येथून पुरंदर कडे मार्गस्थ झाल्यानंतर पुणे-सोलापुर महामार्गाने हा सोहळा लोणी काळभोर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी चौकात विसावला तेथे माजी सरपंच नंदकुमार काळभोर तसेच सराफा असोसिएशनचे सचिन काळभोर व ग्रामपंचायत सदस्य वंदना काळभोर यांनी या सोहळ्याचे स्वागत केले सोहळ्या सोबत आलेल्या भाविकांच्या भाविकांच्या चहापाणी व नाश्त्याची सोय करण्यात आली होती यावेळी दादासाहेब काळभोर तसेच मोठ्या संख्येने स्थानिक उपस्थित होते.

        यावेळी रथ निर्मितीसाठी सचिन काळभोर यांनी २१ हजार रुपयांची मदत केली ती सोहळा प्रमुख ह भ प बाजीराव बांगर महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर तसेच लक्ष्मण चव्हाण उवस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *