पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनीता कराड यांना रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्यनगर तर्फे मानद सदस्यत्व रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. दीपक शिकारपूर, ॲड. अजय वाघ, श्री. विजय रवांदे, डॉ. मधुरा विप्र, श्री. मनोज अग्रवाल, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. किशोर रवांदे आदी उपस्थित होते. मानद सदस्यत्व मिळाल्याने एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम करता येतील. समाजिक बांधिलकी म्हणून एमआयटी नेहमीच समाजाच्या हितासाठी अग्रेसर राहिली असल्याची भावना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *