पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोना महामारीच्या काळात अविरत कार्य बजावणाऱ्या कोरोना योध्याचा  कै. बापूसाहेब अमृता कुंजीर यांच्या प्रथम पुण्यस्मरण व स्वर्गीय मच्छिन्द्र भाऊ कोतवाल पुण्यस्मरण दिनानिमित्त गोरख घुले  व प्रकाश घुले यांच्या वतीने कै.स्व. बापूसाहेब अमृता कुंजीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ मेहबूब लुकडे व त्यांचे सहकारी सर्व डॉक्टर,आरोग्य सेवक, सेविका,आशा सेविका,कर्मचारी तसेच पर्यावरण समिती कुंजीरवाडी आणि एव्हरेस्ट पाईप कंपनीचे मालक अविनाश जगताप यांना सन्मानित करण्यात आले.
          यावेळी या कार्यक्रमासाठी कुंजीरवाडी गावच्या सरपंच अंजु गायकवाड, माजी सरपंच बबन तुपे, अरुण घुले, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, सोरतापवाडीच्या माजी सरपंच पूनम चौधरी, शिवसेनेचे माजी संघटक स्वप्नील कुंजीर, पोलीस पाटील मिलींद कुंजीर,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मेमाणे,साधना नाना कुंजीर, सारिका भोंगळे,लता कुदळे, आशा कुंजीर, अजय कुंजीर, हरेश गोठे, माजी उपसरपंच संतोष कुंजीर, योगेश गायकवाड, विकास निगडे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष बापू घुले, गणेश सावंत, रामदास कुंजीर, काळूराम कुंजीर नवनाथ आंबेकर,आदेश जाधव,नंदूशेठ बारवकर,बापू सावंत,सागर झेंडे, सुरेश झेंडे, गजानन जगताप, सुधीर कुंजीर, माऊली सावंत, नितीन घुले, अविनाश काशिकर, योगेश झेंडे, सचिन कुंजीर, काळूराम कुंजीर, नवनाथ आंबेकर, अक्षय सावंत तसेच पर्यावरण संरक्षण समितीचे सदस्य व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख घुले यांनी केले व आभार मिलिंद कुंजीर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *