पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारावर वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी अंतर्गत येणाऱ्या थेऊर व कुंजीरवाडी या ग्रामपंचायतीने कंबर कसली असून आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या फवारण्याव धुरळण्याची कामे जोरात चालू आहेत. दरवर्षी थेऊर मध्ये डेंग्यू व चिकूनगुणिया हे आजार तोंड वर काढतात.अलीकडे डासांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळणे परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे
कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारा विषयी जनजागृती करुन डेंग्यू,चिकुनगुनिया,मलेरिया, यांसारखे साथीचे आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी आवश्यक असणारे सर्व उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सर्व भागात,वाड्यावस्ती, गावठाण बाजार मैदान,याठिकाणी धुरळणी यंत्राद्वारे किंगफोग औषध टाकून धुरळणी करण्यास ग्रामपंचायत कर्मचारी बबलू बोंडरे,विठ्ठल गावडे,जितेंद्र शेलार यांनी सुरुवात केली आहे तसेच सर्वत्र साथीच्या आजाराविषयी भोंगागाडी फिरवून दवंडी देऊन जनजागृती केली. कुंजीरवाडी आरोग्य केंद्राचे आरोग्य आधिकारी डॉ.महेबूब लुकडे, यांनी कुंजीरवाडी गावात पाहणी करुन आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा सेविकानी वाड्यावस्तीवर जाऊन लोकांना या साथीच्या आजाराविषयी माहिती दिली तसेच या आजारांपासून कसे संरक्षण करायचे याची माहिती दिली घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले, तपासणी केली यात जनावरांचे गोठे, पाण्याच्या टाक्या तपासून जिथे पावसाचे पाणी साचले आहे त्याठिकाणी औषध फवारणी केली. गावात सर्वत्र बी एच सी पावडरची धुरळणी केली व गावात कोरडा दिवस पाळण्यास सुरुवात करण्यात आली.
थेऊर ग्रामपंचायतीने गाव वाड्या वस्त्या येथे धुरळणीचे काम चालू केले असून गावात आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळण्यास सुरुवात केली आहे. फवारणी व धुरळणी यावर प्रकाश आळंदे लक्ष ठेवून आहेत.
” साथीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी परिसर व गाव स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे काही आजार उद्भवले तर ताबडतोब डॉक्टराशी संपर्क करावा”
चंद्रकांत मेमाणे ,
(सदस्य, ग्रामपंचायत कुंजीरवाडी)
