थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) महाराष्ट्रातील विद्यापीठ सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर केल्याने विद्यापीठांची स्वायत्तता राहणार नाही त्यावर राजकिय वर्चस्व प्रस्थापित होईल त्यामुळे या विधेयकाला विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला तरीही हे विधेयक मंजूर झाल्याने ही लोकशाहीतील काळा दिवस अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे.
आज विधानसभेचे बिगुल वाजले त्यापूर्वी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील विद्यापीठासंदर्भातील सुधारणा विधेयक चर्चस मांडले होते परंतु ती चर्चा अर्धवट आटोपून ते पास करून घेतले त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्याना आता प्रकुलपती चा दर्जा प्राप्त होणार असून प्रत्येक निर्णयाला त्यांची सहमती आवश्यक असणारे आहे.
यावर विरोधकांनी तिव्र विरोध करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सर्व स्तरावर याविरोधात लढाई करणार असल्याचे जाहीर केले तर प्रथम राज्यपाल यांना भेटून त्यांच्या अधिकारात काही मार्ग निघाला तर ठीक अन्यथा न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करून लढाई करणार असल्याचे जाहीर केले.
त्याच बरोबर जानेवारी च्या पहिल्या आठवड्यापासून भारतीय जनता युवा मोर्च्या तसेच सहयोगी यांच्या सहकार्याने राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आंदोल करणार असल्याचे सांगितले.
