थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)     ग्रोथ फाउंडेशचे अध्यक्ष शेख रहिमान मकबुल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रोथ फाउंडेशन व नंदिनी अम्ब्युलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक २८ डिसेंबर २०२१ पासून मोफत रुग्णवाहिका देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे ही रुग्णवाहिका पुणे सोलापूर  महामार्गवरील शेवाळवाडी, लोणी काळभोर , कदमवाकवस्ती,थेऊर या गावातील गंभीर आजारी कोविड रुग्ण, अपघातात गंभीर जखमी असलेले रुग्ण यांना विनामूल्य रुग्णवाहिका नजीकच्या हॉस्पिटल पर्यंत पोहोच करण्याची सुविधा या माध्यमातून दिली जाणार आहे . सर्वसामान्य जनतेला महागाईच्या काळात थोडीशी मदत या माध्यमातून केली जाणार आहे. सदर सेवा २४ तास उपलब्ध असणार आहे . गरीब व अपघातग्रस्त रुग्णांची सेवा करणे हे संस्थेचे धोरण आहे . मनुष्य सेवा हिच ईश्वरसेवा या वाक्याने प्रेरित होवून हा उपक्रम सुरु केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शेख रहिमान यांनी दिली आहे . सदर सेवेसाठी ९४२१५७४३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *