थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  शेवाळेवाडी येथे खनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाळू ट्रक वर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कॉलवर येथील तलाठी राजेश दिवटे यांना आठ ते दहा जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली हा गाडीच्या तहसीलदार यांच्या सूचनेनुसार हे दोन ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना हडपसर परिसरात आडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचे संरक्षण नव्हते त्यामुळे अशा घटनेत शासकीय कर्मचारी यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो यामुळे पुणे जिल्हा तलाठी संघ अध्यक्ष पवन कुमार शिवले यानी हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांना एक पत्र देऊन हल्लेखोरांवर दोन दिवसात कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु त्यावर कसलीही कारवाई झाली नसल्याने आज सोमवार दिनांक २८ पासून तलाठयांनी काम बंद आंदोलन चालू केले आहे.

          गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा पथके निर्माण केली जातात यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असला पाहिजे परंतु गेल्या काही दिवसात असे होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महसुली कर्मचाऱ्यांना कारवाई करताना अनेक अडचणी येत आहे कोळवडी तलाठी दिवटे यांनी एकट्याने कारवाई केल्याने हे त्यांच्यावर बेतले, त्यामुळे भविष्यात योग्य पथके तयार करूनच कारवाई केली तर यात ही संघटना सहभागी होईल अन्यथा अशा कारवाईत ते सहभागी होणार नाहीत
          वरिष्ठ अधिकारी वेळी अवेळी कारवाई करण्यासाठी आदेश देतात परंतु केवळ तलाठी व मंडलाधिकारी यांना या सूचनांचा अवलंब करावा लागतो कुठल्याही प्रकारचे पोलीस बंदोबस्त यावेळी देण्यात येत नाही त्यामुळे अनेक वेळेला महसुली कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्र राज्यात घडलेल्या आहेत काही जणांनी आपला जीव गमावला आहे एखादा कर्मचारी कर्तव्यावर असताना काही अनुचित घटना घडली तर त्याच्या कुटुंबीयांवर मोठा बाका प्रसंग ओढवतो म्हणून वरिष्ठांनी आदेश देत असताना त्यांच्या संरक्षणाची काळजी घेतली गेली तर कारवाई करण्यास कर्मचारी नक्कीच सरसावतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *