थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला असून आज ३१ नव्या रुग्णांची भर पडली आहे आजतागायत एकूण १४१ रुग्ण व मायक्रोन या नवीन व्हेरियंटने संक्रमित झालेले आहे यापैकी मुंबईत २७, ठाण्यात २, पुणे ग्रामीणमध्ये एक तर अकोल्यात१ रुग्ण आज रुग्ण सापडले आहेत.
राज्यात ओमयक्राँनच धोका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे असे दिसून येत आहे त्रिसूत्रीचा नक्कीच अवलंब करणे गरजेचे आहे मुख्य पट्टी वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर राखणे यांचा सार्वजनिक जीवनात उपयोग केलाच पाहिजे अन्यथा तिसरी लाट आपल्या दारात येऊन पोहोचलेली आहे हे नक्की निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे राज्य शासनाने अनेक निर्बंध लावलेले असून रात्री नऊ ते सकाळी सहा या दरम्यान जमावबंदी लागू केली आहे सध्या नाताळ सुट्या असल्याने पर्यटनस्थळे ओसंडून वाहू लागले आहेत बहुतेक जण कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे धर्मीय स्थळाच्या ठिकाणी ओमायक्रोन चा अधिक धोका जाणवतो आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कडक प्रतिबंध घालून देण्याची वेळ आली आहे नोडल अधिकाऱ्याकडून यावर लक्ष ठेऊन प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थिती ची पाहणी करणे आवश्यक आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याने हिवाळी अधिवेशन सुद्धा अडचणीत सापडले आहार यात पोलीस, सरकारी कर्मचारी व पत्रकार यांना कोरोनाची लग्न झालेली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील नवोदय विद्यालयातील एकूण ५२ विद्यार्थ्यांना कोरण्याची लागण झाल्याने तो बफर झोन घोषित करण्यात आला आहे.दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रतिबंध अधिक कडक लादले जाऊ शकतात.
