थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) जल जीवन मिशन अंतर्गत नायगाव येथे झालेल्या विकासकामांचा आढावा व प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी मिशनचे संचालक ऋषिकेश यशोद यांनी भेट दिली.यासाठी १७ लाख रुपयांचा निधी गावातील उर्वरित वाड्या वस्त्या येथे बंद नळपाणी पुरवठा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
         यावेळी गावातील पाणी व स्वच्छता व्यवस्थापन याबाबत गावात कार्यान्वित असलेली योजना तसेच जलजीवन अंतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावित कामाचे नियोजन याची माहिती त्यांना देण्यात आली तसेच पाण्याचे असणारे स्त्रोत व वितरण व्यवस्था याची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली तसेच शासनाच्या योजनेची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व चालू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले व या योजनेअंतर्गत लवकरच शंभर टक्के कामे पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी अमित आडे (कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद), पांडुरंग गवळी (उपअभियंता), किरण तांबुळकर (शाखा अभियंता), खरात मॅडम (शाखा अभियंता),  तसेच गावचे सरपंच गणेश चौधरी, उपसरपंच पल्लवी गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चौधरी, उत्तम शेलार, बाळासाहेब गायकवाड, अश्विनी चौधरी, ग्रामसेवक  विजया भगत, माजी सरपंच राजेंद्र चौधरी, नवनाथ गायकवाड तसेच पाणीपुरवठा समितीचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *