थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) समाज रचनेत पुरुष व स्त्री यांना समान महत्व असले तरी गेली अनेक युगा पासून पुरुष प्राबल्य असून पुरुष प्रधान संस्कृती जोपासली स्त्रियांच्या बाबतीत सर्व निर्णय आज तागायत पुरुषच घेत आलेले आहेत विशेषतः विवाह संस्कृती संबंधी निर्णय घरातील कर्त्या पुरुषा कडूनच होत असतात परंतु यात अनेक वेळा मुलीच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष केले जायचे यातून कौटुंबिक हिंसाचार होण्याची शक्यता अधिक असायची परंतु अलीकडे शासनाने मुलीच्या लग्ना संबंधी विशेष कायदा करून हे वय १८ वर्षे वयापर्यंत निश्चित केले त्यानंतरही अनेक बाल विवाह होतच राहिले यावर प्रतिबंध घालने एक सामाजिक कर्तव्य म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे अठरा वर्ष वयाखालील विवाह हे कायद्याने बेकायदेशीर आहे नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अतिशय योग्य ठरणार आहे कोणतेही शिक्षण पूर्ण करण्यासाठी साधारणपणे २१ वर्ष लागतात आता मुलीच्या लग्नाचे वय निश्चित करून २१ वर्ष केल्याने मुलींचे शिक्षण पूर्ण होईल तसेच त्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी कालावधी मिळणार आहे.या निर्णयावर विविध क्षेत्रातील महिला व मुलींचा प्रतिसाद
एक ग्रहिनी तसेच महिला व बाल कल्याण वर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका वैशाली नाईक यांनी सांगितले की,निर्णय योग्य आत्ता २१ व्या शतकात मुलींचं शिक्षण,करियर सेट होई पर्येंत २५ वय होत
तेव्हा बालविवाहास आळा बसवा म्हणून किमान वय १८ अशी अट होती आजूनपण बालविवाह चालू आहे पण खूप कमी प्रमाण आहे मुली बाहेर असतात शिक्षण, नोकरीनिमित्त निर्णय चांगला आहे ह्या निर्णय ने नक्कीच फायदा होईल, स्वागत करतो आम्ही ह्या कायद्याचे निर्णय चांगला आहे माझ्या मते समस्त स्त्री जातीकडून ह्याचे स्वागत होईल.
पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर यांनी आपली प्रतिक्रिया दिली “मी या निर्णयाचे स्वागत करते.खूप चांगला निर्णय आहे. यामुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी वेळ मिळेल त्या स्वतःच्या पायावर उभे राहतील . शिक्षणामुळे चांगलेवाईट याचा अर्थ कळतो. जीवनात कोणते उद्दीष्ट गाठायचे आहे हे समजते. शारीरिक योग्य वाढ होते. समाजाला एक कायदायाची चौकट घालून दिली की ते पण त्या निणॅयाचे स्वागत करतात. यामुळे बालविवाह या सारख्या प्रथा बंद होतील . मुली योग्य जोडीदाराची निवड करतील. शिक्षणामुळे त्याना नको असलेल्या गोष्टीना स्पष्ट नकार देता येण्याचे धाडस निमाॅण होईल. जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षण घेतील .हे एक सुदृढ समाजचं प्रतिक असेल . उच्च पदअधिकारी होतील एक मुलगी शिकली तर एक अख्खं कुटुंब शिकलं आणि कुटुंब शिकलं तर एक गांव.समाजाच्या जडणघडणी मध्ये महिलाचा सहभाग वाढला तर उत्कृष्ट काम होते. शिक्षणामुळे बोलणयाचे धाडस निमाॅण होते. आपली मते स्पष्ट मांडता येतात . उदयोग व्यवसाय नोकरी स्वताःचे छंद जोपासता येतात.मी या निणॅयाचे मनापासून स्वागत करते .
तर सुवर्णा आपले मत मांडताना म्हणाली की, निर्णय खुप चांगला आहे मुलींमध्ये समजुदार पणा येईल निर्णय शक्ती वाढेल योग्य अयोग्य हे समजेल जीवनातील योग्य मार्ग निवडण्यासाठी कमीतकमी पदवीधर असणे आवश्यक आहे तो टप्पा पूर्ण करण्याअगोदर लग्नाच्या बेडीत अडकवले जायचे आता असे होणार नाही.
अँड पूनम कांबळे यांनी हा निर्णय खूप बदल घडवणारा असल्याचे सांगितले यामुळे मुलीच्या शिक्षणातील अडचणी पूर्णपणे दूर झाल्या आईवडील लग्नासाठी घाई करणार नाहीत तर प्रेमविवाह करणाऱ्यांची मोठी गोची होणार आहे
