थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) टाकाऊ वस्तूतून टिकाऊ पर्यावरण पूरक वस्तू तयार करून येणारा मकर संक्रांतीचा सण महिला भगिनींना साजरा करावा असे आवाहन परीस फाउंडेशनच्या संस्थापिका तथा कुंजीरवाडी च्या माजी सरपंच सुनिता धुमाळ यांनी केला आहे मुळात आपले प्रत्येक सण हे पर्यावरणासंबंधी संदेश देणारे असून अलीकडे त्याचा विपर्यास होत गेला आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली कृत्रिमता वाढत गेली.आज पर्यावरण रक्षणाची मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे त्यासाठी प्रत्येक महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू सौभाग्य वाण म्हणून द्यावे असे त्या म्हणतात
         यासाठी त्यांनी काही सूची दिलेली आहे
   यात
१ ) कापडी पिशवी
२ ) कापडी बटवा
३ ) ब्लाऊज पिस
४ ) फळं
५ ) घरी भाजीपाला असेल तो
६ ) रोपं आवडीनुसार
७ ) घरगुती शिवलेले मास्क
८ ) साबण
९) कुंडी
१० ) रुमाल
असे बरेच काही आपल्या आवडी प्रमाणे व आपल्या ऐपती प्रमाणे घरी तयार करून देवू शकतो.शक्यतो आपल्या गावात कोणकोण टाकाऊतून टिकाऊ कायकाय बनवत असतील तर एकमेकांना सांगा व त्याच्यांकडून त्या वस्तू घ्या. म्हणजे काय होईल कि गावातला पैसा गावातच राहिल .व लोकांच्या कलागुणांना वाव मिळेल व गाव आर्थिक सक्षम होईल.हि सकंल्पना प्रत्येक सणांना राबवली तर गाव आदर्श ठरेल.
             सध्या सर्वात घटक असलेली समस्या म्हणजे प्लास्टिक कचरा जो आपण तयार करतो याला आळा बसला नाही तर भविष्यात येणारी पिढी आपणास माफ करणार नाही प्रत्येक स्त्रीने कापडी पिशव्यांचा वापर करावा व प्लॅस्टिकला नकार द्यावा
          मकरसंक्रांतीला सौभाग्य वाण देतो ते पर्यावरण पूरक असावे यासाठी महिलांनी आग्रही भूमिका घ्यावी आणखी बराच कालावधी आपल्याकडे आहे तयारीला लागा असे त्यांनी आवाहन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *