थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) चिंतामणी ग्रामविकास प्रतिष्ठाण याच्या वतीने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची संगता हभप आसाराममहाराज बडे आंळदी देवाची याच्या काल्याच्या कीर्तनाने झाली महाराजांनी समाजाच्या विविध पैलूचे आपल्या कीर्तनातून दर्शन घडविले तसेच आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे सांगून भाविकाना मंञमूग्ध केले   या सप्ताहात काकड आरती,  ग्रंथराज ज्ञांनेश्वरी पारायण,गाथा भजन,महिला भजन,हारिपाठ,किर्तन,हरिजागर कार्यक्रम घेण्यात आले ग्रंथराज ज्ञांनेश्वरी दिंडीचे बैलगाडीमध्ये आकर्षक फूलांनी सजावट करुन मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली यावर्षी सप्ताहाला २४ वर्षे झाली असून या अखंड हरिनाम सप्ताहाचे कलशपूजन, वीणा,ग्रंथपूजन शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार,चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त पांडुरंग काळे, हभप विठ्ठलमहाराज कोरेडे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी सरपंच तात्यासाहेब काळे,  माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, संभाजी कुंजीर, थेऊरच्या सरपंच शितल काकडे, उपसरपंच आप्पासाहेब काळे,स्वराज संघाचे अध्यक्ष ज्ञानोंबा कुंजीर, मुंबई महापौर केसरी आबा काळे, एकनाथमहाज तारु, चिचंवड देवस्थानचे विश्वस्त आनंदमहाराज तांबे, यशवंत कुंजीर, नरसिंग सुरवसे,एकनाथ काळे,चिंतामणीमहाज तारु,लक्ष्मण कुंजीर,तुकाराम चव्हाण,शहाजी जाधव,अर्जुन देवकर,आनंद वैराट ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, राहूल कांबळे,सागर राजगुरु उपस्थित होते यामध्ये सात दिवस किर्तन सेवा आंनदमहाराज तांबे,चिंतामणीमहाराज तारु, प्रविणमहाराज चौधरी,रामशास्ञी,सिध्देशमहाराज गाडे,श्रीराममहाराज शेळके, शिवचरिञकार बाजीरावमहाराज बांगर यांची सात दिवस किर्तने झाली तर व्यासपीठ चालक केदारमहाराज पवार,मृद्रांचार्य कृष्णा मोरे,राहूल लोंढे,हार्मोयिनम लक्ष्मण कुंजीर,  गायनाचार्य बळीराम शिंदे,पांडुरंग शिंदे,विष्णू जगताप,धुरवेमहाराज यांनी त्यांना साथ दिली चिंतामणी प्रासादिक भंजनी मंडळ यांनी स्वागत केले काल्याच्या कीर्तन झाल्यावर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *