थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या के जी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवी खंडू गावडे यांनी थेऊर येथील नागरिकांना सार्वजनिक सुविधा पुरवल्या याचाच एक भाग नुकतीच आखाडेवस्तीत गटार व रस्त्याची समस्या असल्याने त्यासाठी स्वखर्चाने भूमिगत गटार व काँक्रीट रस्त्या तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन त्या कामाचे भूमिपूजन थेऊर ग्रामपंचायत माजी उपसरपंच नितीन कुंजीर,रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मारूती कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद वैराट, यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी केजी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष खंडू गावडे,मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सिताराम लांडगे, लक्ष्मण चव्हाण,देवा गावडे, अमर जाधव, सुभाष आखाडे, पत्रकार गणेश धुमाळ, अमोल गायकवाड, खंडु सोनटक्के, आखाडेवस्तीतील नागरीक उपस्थित होते
