पुणे (ऑनलाइन हवेलीनामा) खुनाच्या प्रयत्नातील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता यात तो गंभीर जखमी झाला होता ही तक्रार दाखल झाल्या नंतर त्याच्या अनुषंगाने तपास करण्याच्यासूचना देण्यात आल्या होत्या.
या गुन्ह्यातील आरोपी शैलेश बिडवे व त्याचा साथीदार वाघोलीतील बाबा चायनीज सेंटर येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक कैलास साळुंके व विनायक साळवे यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे यांनी तपास पथकासह तेथे सापळा रचला व त्या आरोपींना ताब्यात घेतले.त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे शैलेश उत्तरेश्वर बिडवे व किशोर चंद्रकांत व्हडले असे सांगितले तसेच त्यांनी वाघोलीत अक्षय कवडे याच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे मान्य केले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश तटकरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार मोहन वाळके,पोलीस नाईक अजित फरांदे, कैलास साळुंके,विनायक साळवे,पोलीस अंमलदार समीर पिलाने,बाळासाहेब तनपुरे यांनी केली.
