पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) गणेश भक्तांना प्रिय असलेल्या श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन आज श्रावण चतुर्थीस घेता आले नाही त्यामुळे केवळ कळस दर्शन घेऊन भाविक परतले.
कोरोनाच्या संसर्गाचा धोका असल्याने राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत त्यामुळे आपल्या देवतांचे दर्शन घेता येत नाही थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र हे पुणे शहरापासून जवळ असल्याने भक्तांची मोठी गर्दी असते आज वर्षातील महत्वाची चतुर्थी आहे सकाळपासून भक्त मन्दिर परिसरात दर्शनासाठी गर्दी करत होते परंतु मन्दिर बंद असल्यने त्यांना दर्शन मिळाले नाही
पहाटे ५ वाजता चिंतामणीचे पुजारी अजय आगलावे यांनी पूजा केली तर चिंचवड देव्स्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी पूजा केली मन्दिर बंद असले तरीही धार्मिक कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालू होते
दिवसभर मन्दिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती मन्दिर बंद असले तरीही भाविक आल्याने बाजार पेठ खुलताना दिसली
