बारामती (हवेलीनामा ऑनलाइन) राज्य सरकारनं पगारवाढीची घोषणा केली तरीही एस टी कामगारांनी संप सुरू ठेवला आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर कर्चमचारी असून. या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. ‘असा हट्टीपणा कधीच चालत नाही,’ असं परखड मतही त्यानी मांडले.
माळेगाव येथील राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर पुन्हा भूमिका मांडली आहे. ‘एसटीच्या प्रश्नावर संपूर्ण विचार करून जो काही मार्ग काढता येईल, तेवढा प्रयत्न केलेला आहे. बारामती डेपोतील कर्मचाऱ्यांनाही विनंती केली आहे. सरकारने चांगली पगार वाढ दिलेली आहे. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, तो उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीपुढे आहे. त्या समितीचा निर्णय आम्ही मान्य करू असं खुद्द परिवहन मंत्र्यांनी न्यायालयात सांगितले असल्याने कामगारांनी आता एसटी सुरू करावी,’ असं अजित पवार म्हणाले.
‘राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत, ग्रामीण भागातील मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी सोय नाही. गोरगरिबांना एसटीची गरज लागते. त्याचा विचार कर्मचाऱ्यांनी करावा. कामगारांना बाकीच्या सुविधा देत असताना आम्ही पाच-सहा राज्यांच्या महामंडळाचा आढावा घेतला. या महामंडळाच्या बरोबरीनं व अनेक बाबतीत थोडं जास्त आम्ही आपल्या कामगारांना देण्याचा प्रयत्न केला आहे. एसटी आपलीच आहे या भावनेनं एक मध्यममार्ग काढला आहे. मात्र, काहीजण आजही भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला
