शिरूर (हवेली नामा ऑनलाइन)
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे अहमदनगर
महामार्गालगत बाबुराव नगर या उपनगरात गुन्हेगारीचा प्रश्न सतावू लागला असल्याने येथे पोलीस चौकी सुरु करावी अशी मागणी रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्यावतीने शिरूरचे पोलीस
निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.
   यावेळी रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले,उपाध्यक्षा शशिकला काळे, सदस्या सुवर्णा सोनवणे, राणी शिंदे, जया खांडरे,
वैशाली गायकवाड, ॲड.सीमा काशीकर, छाया हार्दे, सारिका, विरसेव, ज्योती हांडे उपस्थित होत्या.
        शिरूर शहराच्या पुणे नगर या बाह्यमहामार्गालगतच्या उपनगरात बाबुराव नगर येथे दिवसेंदिवस गुन्हेगारीचा प्रश्न सतावु लागला असल्याने पोलीस चौकी उभारण्याबाबत पोलीस
प्रशासनाने गांभीर्याने विचार कारावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *