थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कात्रज परिसरातील भरती विद्यापीठ परिसरात एका तरुणाची भरदिवसा गोळीबार करून हत्या करण्यात आली त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.यात समीर उर्फ़ सम्या मणुर (वय ४० , रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराचा हा थरार घडला आहे. समीर हा
चौकात उभारला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या
हल्लेखोरांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला.यात तव गंभीर झाला, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. माहिती
मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान
शहरात भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा चर्चेत आले असून गोळीबारासारख्या घटना वारंवार घडत आहेत घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन तपासाचे सूत्र हलवली आहेत परिसरातील सी सी टी व्ही तपासून हल्लेखोरास पकडले जाईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले
