वाघोली (हवेलीनामा आॕनलाईन) देशाचे माजी कृषीमंञी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्तने वाघोली येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने होम मिस्टर स्पर्धाचा कार्यक्रम दिं१२डिसेंबर रोजी वाघोलीतील बाजार मैदान याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे,व पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केले असून यामध्ये होम मिनिस्टरचे सादरीकरण रुपेश परुळीकर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण स्वराज रक्षक संभाजी मलिकेत येसूबाईंची भूमिका साकरलेल्या आभिनेञी प्राजक्ता गायकवाड असून या कार्यक्रमामध्ये विजेत्यांना अनेक बक्षीसांचे वाटप करण्यात येणार आहे यामध्ये प्रथम क्रमांक साठी एक एक्टिवा गाडी आणि पैठणी साडी दुसऱ्या क्रमांकसाठी एलसीडी टीव्ही व पैठणी तृतीय क्रमांक फ्रिजव पैठणी चतृर्थ क्रमांक वाॕशिंग मशीन व पैठणी पाचवा क्रमांक ओव्हन व पैठणी तसेच लकी ड्राॕ बक्षिसे मानाच्या सात पैठणी साड्या व सोन्याची नथ विजेत्यासाठी ठेवले असून हा कार्यक्रम बाजर मैदान येथे १२डिसेंबर रोजी होणार आहे.
परिसरातील महिलांना ही एक पर्वणी असून यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
