थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा आज सुरु झाल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा  शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर येथे अचानक भेट दिली यावेळी शाळेमध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते हे पाहून समाधान व्यक्त केले त्यांनी शाळेतील शिक्षकांशी शालेय गुणवत्तेविषयी सविस्तर चर्चा केली यावेळी त्यांनी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा  विकास साधावा . सर्व वर्गात जावून विद्यार्थ्यांना भेट दिली . विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या . शालेय तसेच इतर हितगुज केले . विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून घेण्यासाठी त्यांनी विदयार्थांना प्रश्नोत्तरे विचारली. इयत्ता पहिलीच्या वर्गात पुस्तके व गुलाब देवून नवागतांचे स्वागत केले . शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्वाण दिन मुलांसोबत साजरा केला . पालकांसोबत मुलांच्या प्रगतीविषयी चर्चा केली .तसेच पालकांशी इतरही गप्पा मारल्या शाळेविषयी समाधान व्यक्त केले . पुढिल वाटचालीस शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक सुर्यवंशी सर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *