पुणे ( हवेलीनामा ऑनलाईन ) लोणी काळभोर पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन त्याचेकडून दोन दुचाकी वाहने व पाच मोबाईल हस्तगत केले आहेत, तो एक विधिसंघर्षग्रस्त बालक असून त्याच्याविरुद्ध हडपसर, सिंहगड व लोणी काळभोर पोलिसात गुन्हे दाखल आहेत.
लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या उरुळी देवाची पोलीस चौकी परिसरात वडकी येथे पोलीस गस्ती पथक रात्र गस्तीवर असतात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक मुलगा लक्ष्मी वजन काटा वडकी येथे संशयास्पद रीत्या दुचाकीवर उभा दिसला त्यास पोलिसांनी हटकवले तेंव्हा तो पळून जात असताना त्यास थांबण्यास सांगितले परंतु तो थांबला नाही त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले तेंव्हा त्याच्याकडे असलेले वाहन मोबाईल आशा सर्व वस्तू चारीच्या असल्याचे त्याने सांगितले, त्या विधिसंघर्षग्रस्त बालकास पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्याच्याकडे आणखी एक दुचाकी वाहन व चार मोबाईल मिळून आले त्याच्याकडून एकूण रु.१ लाख ९ हजार चा मुद्देमाल हस्तगत केला.
हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, निकीतेन निंबाळकर, अमृता काटे, पोलीस अमलदार शंकर नेवसे, अविनाश जोशी, विनोद कांबळे, अभिजित टिळेकर, विभीषण कुटेवाड, दीपक सोनवणे यांनी केली.
