पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे शहर आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या परिसरात कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याच्यासूचना दिल्या होत्या त्यानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन परिसरात शास्त्राचा धाक दाखवून नागरिक व व्यापारी यांच्यावर दहशत पसरवून पैशाची मागणी करणाऱ्या शिरसाठ टोळीवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, लोणी काळभोर पोलीस स्टेशन परिसरातील सराईत गुन्हेगाराची माहिती घेण्यास अधिकारी व अंमलदार यांना सूचना केल्या त्यानुसार लोणी काळभोर परिसरात प्रणव भारत शिरसाठ(लोणीस्टेशन,आंग्रवस्ती, कदमवाकवस्ती) व त्याचे दोन साथीदार अभिजित अभिमन्यू आहेरकर(लोणी काळभोर) व सौरभ गोविंद इंगळे(इराणीवस्ती लोणीस्टेशन) हे लोणी परिसरात कोयते, कुऱ्हाड अशी घातक शस्त्रे जवळ बाळगून सभ्य नागरिक व व्यापारी यांना त्रास देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे लुबाडतात काही वेळेला मारहाण करून अनेक वेळा त्रास देण्याच्या घटना घडल्याचे समजले त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे नागरिकांना असुरक्षित वाटत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे या टोळीचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांचेकडे पाठवला यावर पडताळणी करून या टोळीवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

       ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता  पाटील, सहाय्यक पोलीस उपायुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुभाष काळे,पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे,पोलीस हवालदार गणेश सातपुते पोलीस नाईक संदीप घनवटे, पोलीस शिपाई गणेश भापकर मल्हार ढमढेरे यांनी केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *