थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) लोणीकंद पोलीस स्टेशन परिसरात भागात गोल्डमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या गुन्हेगार सचिन शिंदे याचा फेब्रुवारी २०२१ मध्ये गोळया घालून खुन करणारे आरोपी काही दिवसांपूर्वी जामीनावर बाहेर आले असून ते गुन्हयातील साक्षीदारांना घातक शस्त्रे दाखवून दहशत निर्माण करत आहेत अशी बातमी गुन्हे शाखा,युनिट६.पुणे शहरचे पोलीस अंमलदार ऋुषिकेश ताकवणे व ऋुषिकेश व्यवहारे यांना माहिती मिळाली होती.
यात पोलीस आधिकारी व अंमलदार हे गस्त घालत असताना पोलीस नाईक रमेश मेमाणे यांना बातमी मिळाली की, सचिन शिंदे याच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपी हे शिवाजीनगर न्यायालयामध्ये तारखेला आलेले आहेत व त्यांच्या जवळ घातक शस्त्रे आहेत,यावर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कल्पना दिली व युनिट ६ चे पथक व पुणे शहर पथकासह कामगार पूतळा, शिवाजीनगर न्यायालयाजवळ, सापळा रचून आरोपी जात असलेल्या स्कार्पिओ गाडीस थांबवून त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी त्यांचे नाव १)प्रथमेश ऊर्फ सनी कुमार शिंदे,वय-२१ वर्षे रा. मु.पो.लोणीकंद शिंदेवस्ती, ता.हवेली जि.पुणे. असे सांगून स्कॉरपिओ चालकाने २)गणेश दिनकर दाते,वय-३० वर्षे,रा. मु.पो.सोनेसांगवी,दातेमळा,ता.शिरुर जि.पुणे.३ )ऋतिक काळूराम शिवले वय १९ वर्षे रा.मु.पो. लोणीकंद, गणेश मंदिराचे मागे, ता.हवेली जि. पुणे. ४ ) रोहित दत्ता मंजूळे वय १९ वर्षे रा. वाघेश्वरनगर वाघोली ता.हवेली जि.पुणे. ५) आकाश राजू दंडगुले वय २० वर्षे, रा.सदर. ६) अदित्य राजाराम डफळ,वय २१ वर्षे,रा.मु.पो. धामारी गोकूळनगर,ता. शिरुर जि.पुणे ७) मनोज लक्ष्मण साळवे, ३१ वर्षे,रा.इंद्रायणीनगर,राजवाडा बिल्डींग नं.८ रुम नं. २, भोसरी पुणे असे सांगितले. त्यांची पंचासमक्ष झडती
घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल, एक जिवंत काडतूस,दोन कोयते, दोन लाकडी दांडके असा मुद्देमाल सापडला.
ही कामगिरी गुन्हे शाखा,युनिट ६ चे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पो.उप.निरी.सुधीर टेंगले,पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ
कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
