पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) वादग्रस्त वक्तव्यासाठी कायम चर्चेत असलेल्या कंगना राणावत आज पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली यावेळी तिने चक्क देशाच्या स्वतंत्र्य संदर्भात बरळली असून देशाला १९४७ मध्ये मिळालेलं स्वतंत्र ही भीक होती तर देशाला खर स्वतंत्र २०१४ मध्ये मिळाले असल्याचे एका कार्यक्रमात सांगितले.
देश स्वतंत्र झाला आणि नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले त्यामुळे आपल्याला संचार, चिचार तसेच विहाराचे स्वतंत्र मिळाले परंतु मूलभूत कर्तव्याकडे मात्र आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो नेमकं असच काही घडताना दिसून येत आहे आपण एकमेकांबद्दल काहीही आरोप प्रत्यारोप करू शकतो परंतु आपल्या देशाबद्दल मात्र काही अपशब्द उच्चारन्याचा अधिकार कोण देत मुळात हे धाडस होत कस हा प्रश्न निर्माण होतो.
कंगना च्या आजच्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली असून तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे
