थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  उत्तर भारतीयात अतिशय पूजनीय असलेल्या छट पूजेचे आयोजन नदीकाठी करण्यात आले थेऊर येथील मुळा मुठा नदी किनारी या परिसरातील उत्तर भारतीय बांधवांनी गर्दी केली होती
       छठ पूजा हे भारतामध्ये मानवाला जाणारा एक व्रत आहे, या पूजेस विशेष महत्व आहे.या पूजे मध्ये सूर्यदेवाची उपासना करतात तसेच वेद पुराणातील माहितीनुसार छठ देवी, सूर्यदेवाची बहीण आहे आणि छठ पूजेच्या वेळी त्या दोहोंची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते.पौराणिक कथेनुसार छठ पूजे ची सुरवात हि रामायणाच्या कालावधीत झाली होती, ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील लोक संक्रातीला सूर्याची उपासना करतात त्याच प्रमाणे उत्तर भारतीय लोक छठ पूजेच्या निमित्ताने सूर्याची उपासना करतात.छठ पूजा विशेषत: सर्वात जास्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, नेपाळ या ठिकाणी केली जाते.छठ पूजा हि दिवाळी संपल्यानंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून या पूजेस सुरवात होते. या छठ पूजेला सूर्य षष्ठी पूजा असेही सुद्धा म्हटले जाते.
         छठ पूजेमागील पौराणिक कथा
पौराणिक मान्यतेनुसार, छठ पूजेची सुरवात सूर्यपुत्र कर्णाने केली, कर्ण हा दानशूर होताच, शिवाय तो सूर्याचा पुत्र असल्यामुळे जन्मत:च त्याला कवचकुंडले प्राप्त झाली होती. त्या कवचकुंडलाची शक्ती वाढावी, या करिता तो दररोज सकाळी पाण्यात उभा राहून सूर्यदेवाची उपासना करत आणि सूर्याला अर्घ्य देऊन मगच दिवसाची सुरुवात करत असे. महाभारताच्या राजकारणात, द्युतात आपले सर्वकाही गमावल्यानंतर पांडवांना त्यांचे गतवैभव परत मिळावे, म्हणून द्रौपदीने देखील सूर्याची उपासना केली होती. सूर्य देवांच्या आशीर्वादाने तिची मनोकामना पूर्ण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *