शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन)
शिरूरला एस.टी.कर्मचा-यांनी राज्य शासनात विलीनीकरण करुन घेण्याच्या मागणीसाठी पुकारलेला संपाच्या तीस-या दिवशी मुंडन आंदोलन करुन राज्य शासनाचा निषेध करत लवकरात लवकर मागण्या पुर्ण करण्याची मागणी केली.
दिवसेंदिवस विविध संस्था संघटनांचा आंदोलनास पाठिंबा वाढत आहे.गेले तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या बेमुदत संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येत असुन परिणामी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने अधिक प्रवास भाडे द्यावे लागत आहे.एस.टी.कर्मच्या-यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात अशा प्रतिक्रिया प्रवासी व नागरिकांमधुन व्यक्त होत आहेत.
दरम्यान एस.टी.कर्मच्याऱ्यांच्या संपास मनसेच्यावतीने सहभाग घेत पाठिंबा देऊन सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी मनसे जनहित कक्षाचे सुशांत कुटे,शहराध्यक्ष अविनाश घोगरे,तालुका उपाध्यक्ष रविंद्र गुळादे,महिला आघाडीच्या डॉ.वैशाली साखरे,माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर,रमणलाल भंडारी,सुदामा चव्हाण, सचिन जाधव उपस्थित होते.शिरुर शहर नाभिक संघटनेच्यावतीने या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.यावेळी सल्लागार गोरक्ष गायकवाड,रणजीत गायकवाड,शहराध्यक्ष सनी थोरात, उपाध्यक्ष वैभव रायकर, सचिन शिंदे,प्रितेश फुलडाळे,प्रतिक गायकवाड,तेजस गायकवाड उपस्थित होते.
