थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोना महामारीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आठवडे बाजार बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर गदा आली जवळपास दीड वर्ष हे व्यवहार ठप्प झाले होते परंतु गेल्या काही दिवसांपासून लसीकरनाचा वेग वाढल्याने रुग्ण संख्या खूप नियंत्रणात आली त्यामुळे सर्व आस्थापने हळूहळू चालू झाले आणि गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील आठवडे बाजार पूर्वपदावर येऊ लागली आहेत

         ग्रामीण भागाततील अठावडे बाजार कोरोना महामारी मुळे बंद होते शासनाने अनेक गोष्टीवर निर्बंध आणाले होते कोरोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात आल्याने शासनाने हळूहळू निर्बंध हटावण्यात आले त्यामुळे ग्रामीण भागातील ठप्प झालेले व्यवसाय बाजार पेठ मंदीरे सुरु झाली असून ग्रामीण भागातील बाजार सुरु झाल्याने शेतकरी व्यापारी वर्ग यांची आर्थिक बाजू हळूहळू सुधारण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्यात आंनदाचे वातावरण आहे त्यामुळे गावातील अर्थ चक्रे फिरु लागली तसेच ग्राहकाला देखील बाजारात गावातील दैनंदिन मंडई पेक्षा स्वस्तात तरकारी थेट शेतकऱ्यांकडून मिळत असल्यामुळे ग्राहक देखील समाधानी आहेत बाजार सुरु झाल्यामुळे गावातील अर्थ चक्रे वेगाने फिरली असून गावातील इतर व्यापारी देखील आंनदी आहेत बाजारपेठ पूर्ववत होत असल्यामुळे  शेतकरी व्यापारी ग्राहक सर्वच समाधानी आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *