थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीच्या भागातील पंचशील नगरमध्ये ऑक्टोबर महिन्यात पाच घरावर दरोडा पडला याची माहिती तेथे रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार संदीप कदम यांना मिळताच ग्रामसुरक्षा दलातील जवानांच्या सहकार्याने दरोडेखोरांचा पाठलाग करून एकास जेरबंद केले परंतु यात कदम यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांना जखमी केले तरीही त्यांनी एका दरोडेखोरास जेरबंद केले होते कदम यांनी दाखवलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
कर्तव्यदक्ष पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आव्हानांना तोड देण्याची तयारी असते याचेच उदाहरण म्हणजे यवत येथील ही घटना आहे. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अपुरी पोलीस यंत्रणा असताना दखील असणाऱ्या पोलीस दलाकडून नागरी सुरक्षा पुरवली जाते पोलीस हवालदार यांच्यावर दगड विटांचा मारा होत असताना देखील धाडस दाखवून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी दरोडेखोरास पकडले हल्ल्यात त्याच्या गुडग्यास गंभीर जखम झाली होती.

