थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) नायगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा झूम मीटिंगद्वारे दि.३१ ऑक्टोबर रोजी संस्थेचे चेअरमन सुनील बजरंग हगवणे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती
सभेत २०१९ -२०२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे आर्थिक पत्रके, अंदाज पत्रक, लेखापरीक्षण अहवाल , अंदाजपत्रक पेक्षा कमी-जास्त खर्च इत्यादी विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली सभेतील विषयांचे सविस्तर विश्लेषण संस्थापक चेअरमन राजेंद्र चौधरी यांनी केले तसेच २०२० -२१ या वर्षाचा दहा टक्के प्रमाणे लाभांश ३१ मार्च २०२१ अखेरच्या भांडवलावर जाहीर करण्यात आला सहकारी बँकांच्या तुलनेत पतसंस्थांचे व्याजदर नियमित करण्याच्या अनुषंगाने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पासून तारणी कर्जाचा व्याजदर १३ टक्के प्रमाणे करण्यात आल्याचे सांगण्यात आले सभेच्या कामकाजात नितीन हगवणे , सरपंच गणेश चौधरी ,संतोष हगवणे, तानाजी चौधरी इत्यादी सभासदांनी भाग घेतला
झूम मिटींगला उपस्थित असलेल्या सभासदांचे आभार चेअरमन सुनील हगवणे यांनी मानले
याप्रसंगी व्हाईस चेअरमन संजय कामठे व्यवस्थापक व्यवस्थापक नंदकुमार चौधरी व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते
