थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे सोलापूर महागार्गावरील उरुळी कांचन येथे दि.२२आक्टोबर रोजी भर दुपारी वाळू व्यवसायिक संतोष जगताप याच्यावर गोळीबर झाला त्यात तो जागीच ठार झाला तर त्यांच्या अंगरक्षकाने हल्लेखोरावर प्रतिउत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात स्वागत खैरे हा हल्लेखोर जागीच ठार झाला तसेच संतोष जगताप याचे दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले होते त्यापैकी मोनूसिंग (वय३५)हा आज पहाटे मुंबईत उपचारा दरम्यान मृत्यू पावला.
लोणी काळभोर पोलिसांनी या गोळी बर प्रकरणात आजतागायत पाच जणाना अटक केली यातील पवन मिसाळ व महादेव आदलिंग यांना पळसदेव ता. इंदापूर येथून ताब्यात घेतले व त्यांच्याकडून मिळालेल्या महितीनुसार या हल्ल्याचा मुख्य सूञधार उमेश सोनवणे असल्याचे कळले व त्यास पीरचौक शिरुर येथून ताब्यात घेतले.
या हल्ल्यासाठी वापरलेली गावठी पिस्तूले पुरविणार्या दोन व्यक्तीना कूर्डूवाडी व बारामती येथून ताब्यात घेतले
या दोन टोळ्यातील गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली दोन जण जागीच ठार झाले होते तर आज संतोष जगतापचा अंगरक्षक उपचारादरम्यान मृत पावल्याने ही संख्या तीनवर पोहचली आहे
