थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) देश पातळीवरील इडियन प्रीमियल लीग च्या धर्तीवर ग्रामीण भागात रुजू लागली क्रिकेटच्या स्पर्धा अशीच हवेली तालुक्यात होत असलेल्या स्पर्धा नायगाव प्रिमिलीयर लीग स्पर्धेची सर्वत्र चर्चा सुरु आहे नायगांव येथील गावठाणालगत असलेल्या छञपती शिवाजी महाराज क्रिडा संकूलच्या मैदानावर अगदी आय पी एल ची हुबेहुब प्रतिकृती साकारुन गावातील तरुण युवकांचे आठ संघ लिलाव पध्दतीने तयार करण्यात आले यात आठ संघ तयार झाले यासंघाच्या संघमालकानी बोली लावून खेळाडूची निवड केली आणि स्पर्धेला प्रारंभ केला येत संघमालक पुढील प्रमाणे नितीन सुभाष हगवणे यांचा नितिन आप्पा शुट्रर्स,अमोल शंकर चौधरी यांचा श्रीनाथ एम्पायर्स,रविंद्र अवचट यांचा दोस्ती चलेंज,गणेश गुलाब चौधरी,संतोष विठ्ठल हगवणे यांचा जी एस फायटर,राहुल तुकाराम चौधरी,नंदकुमार दत्ताञय चौधरी यांचा आर एन वाॕरियर्स,अजय चौधरी,बाबू केसकर यांचा ए बी फायटर्स,कृष्णा चौधरी,संतोष चौधरी,संजय चौधरी यांचा एस एस के जेन्टस,अतुल चौधरी,निलेश चौधरी,अमोल खेडेकर यांचा रायगड वाॕरियर्स अशा आठ संघ तयार झाले व त्यात फक्त गावातील खेळाडूचाच सहभाग ठेवण्यात आला ही स्पर्धा फक्त गावातील खेळडूसाठीच आयोजित केली यात प्रथम क्रमांक विजेत्या संघास तीस हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून चषक नायगाव ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित नायगाव यांच्याकडून ठेवण्यात आले तर उपविजेत्या संघास वीस हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून चषक नायगांव पतसंस्था यांच्याकडून ठेवण्यात आले आहे तिसरा व चौथा चषक नायगाव संस्थेकडू ठेवण्यात आला आहे यात वैयक्तिक बक्षीससे फेअरप्ले चषक व बक्षीस नायगावचे माजी प्रभारी सरपंच राजेंन्द्र रतन चौधरी यांनी ठेवला सामनावीर चषक माजी उपसरपंच दत्ताञय बारवकर यांनी ठेवला,मालिकावीर चषक व बक्षीस तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नितिन हगवणे यांनी ठेवले,सर्वात्तम फलंदाजास चषक व बक्षीस गोरक्ष चौधरी,राजेंन्द्र हगवणे,शिक्षण समितीचे अध्यक्ष शांताराम उरसळ,माजी ग्रामपंचायत सदस्य किरण भैरवकर यांनी ठेवले सर्वात्तम गोलंदाज चषक व बक्षीस ग्रामपंचायतीच्या सदस्या आरती चौधरी यांनी ठेवले तर वैयक्तिक बक्षीसमध्ये सलग तीन षटकार, सलग चार चौकार चेअरमन सुनिल हगवणे,बोस्टन चहाचे भाऊसो केसकर यांनी ठेवले सलग तीन खेळाडू बाद केल्यावर पवन चौधरी यांनी ठेवले वेगवान अर्ध शतक नरेश चौधरी यांनी ठेवले सर्वात्कृष्ट झेल प्रविण कांचन यांनी ठेवले तर प्रत्येक सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार तसेच पाहिल्या चेंडूवर विकेट घेणाऱ्या खेळाडूला माजी उपसरपंच दत्ताञय बारवकर,सोनू चौधरी यांच्याकडून बक्षीस ठेवण्यात आले स्पर्धेचे आयोजन माजी उपसरपंच दत्ताञय बारवकर यांनी केले यात विशेष बाब म्हणजे चौकार षटकार विकेट पडल्यानंतर डीजे साऊंड सिस्टीमची म्यूजिक देण्यात आले होते त्यामुळे गावातील नागरिकांना बरोबरच आसपासचे प्रेषकांना देखील समान पाहण्याचा मोह आवरत नव्हता त्यामुळे मैदान गर्दी होत होती

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *