पुणे (हवेलीनामा आनलाईन) कुंजीरवाडी
 पर्यावरण फाऊंडेशनच्या वतीने डोंगर माळरानावर तसेच कुंजीरवाडी गावांमध्ये हरित क्रांती घडवण्याचा संकल्प मनाशी बांधून पर्यावरण फाऊंडेशनचे  सर्व सदस्य यांनी गावात तसेच मल्हारगड,गवळेश्वरांच्या डोंगर परिसरात वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली असून लावलेल्या झांडाचे संगोपण देखील या समितीच्या सदस्यकडून नियमितपणे केले जाते जीप गाडीमध्ये पाणी नेऊन बदलीच्या साहाय्याने ते झाडांना पुरवले जाते ही विशेष काळजी घेतली जाते.  स्वर्गिय कै. मच्छिंद्रभाऊ कोतवाल यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त व साप्ताहिक हवेलीनामा वृत्तपत्र प्रथम आवृत्ती प्रकाशन निमित्ताने श्रीक्षेत्र गवळेश्वर या ठिकाणी डोंगरावर जंगली बदाम, भेंडी, पॅरडिया, चिंच, ताम्हण, कदंब अशा प्रकारची देशी वृक्ष पर्यावरण फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे हरेश गोठे यांनी कदंब या वृक्षाची माहिती दिली व वृक्ष लागवड करणे व ती शेवटपर्यंत जपणे ही काळाची गरज आहे असे सांगितले. तसेच आज आप्पा कुंजीर यांच्या वाढदिवसानिमित्त एक चिंच चे झाड लावण्यात आले. यावेळी कुंजीरवाडी तंटामुक्ती अध्यक्ष पै. सचिन कुंजीर, तंटामुक्ती उपाध्यक्ष सागर झेंडे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, उद्योजक गोरख घुले, श्री.वि. का.सो.सदस्य काळूराम कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, माजी.ग्रामपंचायत सदस्य विकास निगडे, माजी उपसरपंच संतोष कुंजीर,भाजपा हवेली तालुका सोशल मीडिया प्रमुख आदेश जाधव, आप्पा कुंजीर, कानिफनाथ कुंजीर, दत्ताजी गव्हाणे उपस्थित होते. तसेच आजचे वृक्षरोपण पूर्ण करण्यासाठी पर्यावरण फाउंडेशन चे विशाल वाईकर, नंदू बारवकर, अनिल कवडे, प्रमोद  जगताप कुंजीरवाडी ग्रामपंचायत सदस्य  हरेश गोठे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *