किरण खुडे
          राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन) पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सदनिकेचा ताबा न देता ती सदनिका दुसऱ्याला परस्पर विक्री केल्याप्रकरणी दोन विकासकाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
     याविषयी मारुती सिताराम बोरकर ( रा. सायगाव, ता.खेड, जि.पुणे) यांनी खेड पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार राज किशोरीलाल चड्डा (रा.सेक्टर नंबर २७, भेळ चौक, निगडी प्राधिकरण,पुणे -४४) आणि गुरूमेल सिंग उधेय (रा. शास्त्रीनगर, पिंपरी पुणे -१७) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज किशोरीलाल चड्डा, व शिवाजी रामलिंग साखरे यांच्याकडून मौजे निघोजे, ता.खेड, जि.पुणे येथील चाकण इंडस्ट्रीयल एरीया फेज नंबर ४ येथील प्लॉट नंबर ए- ७/२- बी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या कॅपीटलसिटी या गृह प्रकल्पातील एफ-विंग या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील सदनिका क्रंमाक ५०२ ही खरेदी करारनाम्याने विकत घेण्यासाठी १०ऑक्टोबर २०१६ रोजी बोरकर यांनी नोंदणीकृत केलेली असताना संबंधीत बिल्डर राज किशोरीलाल चड्डा आणि गुरूमेल सिंग उधेय यांनी ती सदनिका परस्पर २९ जानेवारी २०२१ रोजी सागर राजाराम येळवंडे (रा.निघोजे, ता.खेड, जि.पुणे) यांना विक्री केली. तसेच बोरकर यांना सदनिकेचा ताबा न देता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. याबाबत बोरकर यांनी बिल्डरांकडे विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी पुढील तपास खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *