पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी प्रसिध्द असलेल्या हिंजवडी गावच्या सरपंचपदी विशाल साखरे यांची बहुमताने निवड झाली
हिंजवडीचे सरपंच विक्रम साखरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ग्रामपंचायतीच्या छञपती शिवाजी महाराज सभागृहात मंडल आधिकारी सुहास कांबळे यांच्या अध्यक्षते खाली तसेच सहाय्यक म्हणून हिंजवडीचे तलाठी सागर शेलार, ग्रामविकास अधिकारी दत्ताञय भोजने यांच्या उपस्थित निवडणूक घेण्यात आली
यावेळी सरपंचपदासाठी विशाल साखरे,मयूर साखरे,शिवनाथ जांभूळकर अशा एकूण तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यात शिवनाथ जांभूळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला एकूण१७ सदस्य संख्या असलेल्या हिंजवडी गावच्या सरपंच पदासाठी एकूण सोळा जणांनी मतदान केले यात एक सदस्य गैरहजर राहिल्याने विशाल साखरे व मयुर साखरे यांच्यात निवडणूक झाली यात विशाल साखरे यांनी १६ पैकी १५ मते मिळली तर मयूर साखरे यांना एक मत मिळले त्यामुळे विशाल साखरे यांची हिंजवडीच्या सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक आधिकारी सुहास कांबळे यांनी यावेळी हिंजवडीचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्यानी विशाल साखरे यांचे अभिनंदन केले यावेळी युवा नेते सुरेश हुलावळे,माजी सरपंच मल्हारी साखरे,मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष साखरे,संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक वसंत साखरे,माजी सरपंच शामराव हुलावळे,तानाजी हुलावळे,दिलिप हुलावळे,शिवाजी जांभुळकर,राहूल जांभुळकर,प्रदिप साखरे,शंकर हुलावळे,संदीप साखरे, विश्वास जांभूळकर,सूर्यकांत साखरे,बाबासाहेब साखरे,हिरामण साखरे,कुंडलिक जांभुळकर,माजी उपसरपंच प्रविण जांभुळकर, शरद जांभुळकर,प्रसिध्द गाडा मालक अरुण साखरे इत्यादी उपस्थित होते

