लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन) हवेलीनामा वृत समूहाचे”साप्ताहिक हवेलीनामा” या अंकाचा प्रकाशन सोहळा लोणी काळभोर येथे मोठया थाटात संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्यासाठी लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, मुंबई महापौर केसरी आबा काळे, पंचायत समिती सदस्य तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनिता धुमाळ, आळंदी म्हातोबाच्या सरपंच सोनाली जवळकर यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यानंतर मान्यवरांनी साप्ताहिक हवेलीनामासाठी शुभेच्छा दिल्या यात वाहतूक विभागाचे अधिकारी पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी हवेलीनामाच्या माध्यमातून परिसरातील वेगवेगळ्या विषय मांडले जात असून अचूक मांडणी बद्दल गौरवोद्गार काढले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, हवेलीनामाच्या माध्यमातून हवेलीचे स्वतःचे एक वृत्त पत्र मिळाले असून यात परिसरतील सर्व विषय परखडपणे मांडले जातील अशी अपेक्षा आहे यातील सर्व समूह बातमीदारी अनुभवी असून सर्व विषयास योग्य न्याय देतात.
पंचायत समिती चे माजी उपसभापती तथा सदस्य सनि काळभोर यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनिता धुमाळ यांनी हवेलीनामाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना आजपर्यंत या समूहाकडून पूर्व हवेलीतील मांडलेल्या विषयाचा उल्लेख केला बातमीतील सत्यता जाणून ती प्रकाशित केली जाते विशेषतः सामाजिक विषय हाताळताना नागरिकांचे विचार काय आहेत हे जाणून घेतले जाते
या कार्यक्रमात काँग्रेसचे तुषार जवळकर,बापू काकडे,योगेश काकडे, के जी फाऊंडेशन चे अध्यक्ष खंडू गावडे,रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे,दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, मयूर काळभोर, लक्ष्मण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आयोजन लोणी काळभोर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यालयात संपन्न झाला.यासाठी जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले माजी तालुका अध्यक्ष महेश फलटणकर याचीही मोलाची साथ मिळाली तर हवेली तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे ,उपाध्यक्ष बापू धुमाळ, कार्याध्यक्ष तुषार काळभोर, दिगंबर जोगदंड, विजय रणदिवे, राम भंडारी,हनुमंत सुरवसे या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
