कदमवाकवस्ती (हवेलीनामा ऑनलाइन)ज्ञानाई फाउंडेशन व एस.जी.फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात नव्या जुन्या गीतांचा तसेच कविता व गझलांची सुरेल संगम रसिकांना अनुभवता आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण होते.पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर नगरसेवक प्रशांत जगताप,माजी नगरसेवक फारूक इनामदार यांच्या हस्ते जेष्ठ कवी प्रल्हाद शिंदे यांना काव्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुप्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण यांनी यावेळी त्यांची पैठणी या कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमात अनेक सुप्रसिद्ध कवी गझलकार आणि गायक बाळासाहेब आयवळे, प्रभाताई जाधव,मुकेश वाघमारे,छगन वाघचौरे, राम सर्वगोड,संजय साबळे,रमेश काळे,राहुल जाधव, तर कवी प्रा.विजय काकडे,अनंत राऊत,किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे,प्रा.अशोक शिंदे,योगिता कोठीकर, कविता काळे,आशाताई शिंदे,विद्या पवार,प्रा.दत्तात्रय पवार,अरुण कटारे,अरुण कांबळे,बाबाजी शिंदे, नानभाऊ माळी, चंद्रकांत,जोगदंड,सुरेश धोत्रे,वर्षा ननावरे,बा.ह.मगदूम,जगदीप वनशीव आणि सीताराम नरके यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या गीत गायन आणि काव्य वाचन दोन्ही कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी विनोद अष्टुळ यांनी तर कार्यक्रमाचे आभार डॉ.चारुदत्त नरके यांनी केले.
