थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) संपूर्ण देशात गेली तीन दिवसांपासून दिवाळी या सणाचा आनंद घेतला जात आहे सर्वत्र गोडाधोडाचा बेत आखला जातो परंतू अनेकांना भ्रांत असते ती दोन वेळच्या जेवणाची मग या कुटुंबातील लहानग्याना कुठले आले नवीन कपडे आणि गोड फराळ त्यांनाही आपल्या पालकांच्या कामात हातभार लावण्यात दिवस कसा जातो हे कळत नाही आणि अशात एखाद्या आडोश्याला कधी झोप लागते हे समजत पण नाही.
देश स्वतंत्र झाला परंतु गेल्या ७५ वर्षात अनेक कुटुंब आजही अशा अवस्थेत जीवन जगत आहेत की त्यांना आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिक्षण देता येत नाही घरची हालकीची परिस्थिती असल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी घरदार सोडून फिरावे लागते यात लहान मुलांची फरफट मात्र ठरलेली असते.
आज दिवाळीचा सण साजरा करत असताना लाखो बालके फटाके फोडण्यात नवीन कपडे घालून मामाच्या गावचा रस्ता धरून आनंदाने बागडत असताना मात्र पुण्यातील एका चौकात एक चित्र पहाव्यास मिळाले एक आठ दहा वर्षाचा मुलगा हातात मिरची बिबव्याचे तोरण घेऊन दारोदारी फिरून घरासाठी पैसे जमवत असताना दमून रस्त्यावर दुभाजकाशेजारी थोड्याश्या सावलीचा आधार घेऊन झोपला होता.
