थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  थेऊर मधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कमजोर पडली आहे याचा ताण दैनंदिन कामगार विद्यार्थी तसेच नेहमी कामानिमिताने प्रवास करतात त्यांना सहन करावा लागतो आहे सध्या हडपसर थेऊर दरम्यान केवळ एकच पी एम पी ची बस सेवा देते ती वेळेत मिळत नाही त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत सध्या थेऊर वाघोली या मार्गावर मात्र कोणतीही सोया उपलब्ध नाही त्यामुळे या मार्गावर वाघोली थेऊर अशी पी एम पी बस सुविधा झाल्यास अनेक कामगारांची सोया होणार आहे त्यामुळे पी एम पी व्यवस्थापनाने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी नागरिकांची मागणी आहे.

          वाघोलीचा विस्तार झपाट्याने झाल्याने येथून शहराच्या जवळपास सर्वभागासाठी बस सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कोठेही सहज पोहोचता येते थेऊर वाघोली अंतर केवळ दहा किमी आहे तसेच थेऊर – केसानंद रस्याचे काम झाल्याने रस्ता चांगल्या स्थितीत आहे थेऊर पासून वाघोलीपर्यंत बस सोया झाल्यास नागरिकांची मोठी सोया होणार आहे.
         थेऊरच्या युवा ग्रामपंचायत सदस्या गौतमी मारुती कांबळे यांनी या बाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोरोना महामारीमुळे अनेकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत दिवाळी असूनही महागाईमुळे खूप मर्यादा आल्या दररोज कामासाठी घराबाहेर पडावे लागते त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून रहावे लागते परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बस सुविधा अपुरी आहे त्यात थेऊर वाघोली या मार्गाने अनेकजण कामानिमित्त प्रवास करतात परंतु खात्रीपूर्वक सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे पी एम पी व्यवस्थापनाने या मार्गावर बस उपलब्ध करून द्यावी व नागरिकांची सोया करावी कारण वाघोलीतून सध्या राहू, रांजणगाव, आळंदी इत्यादी ठिकाणी सुविधा दिल्या आहेत मग तीर्थक्षेत्र थेऊरसाठी सुद्धा बस सुविधा दिली जावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *