थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) मागील वर्षी कोरोनाच्या लाटेत दिवाळीचा सण आपापल्या घरात एकटेपणाने साजरा केला गेला परंतु यावर्षी पुन्हा एकदा दिवाळी सणाचा सर्वाना आनंद लुटता यावा यासाठी व येणारे नवीन वर्ष सर्वांना आनंद देवो यासाठी आळंदी म्हातोबा या ठिकाणी इयत्ता दहावीच्या ९७-९८ च्या बॅचच्या वतीने दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने नवोदित गायक कुमार योगेश सरक यांच्या मधुर गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.योग हॉस्पिटलचे डॉ अभिजित दरक,रोटरी क्लबचे विजय शेवाळे,राष्ट्रवादी काँग्रेस हवेली अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,मुख्याध्यापक अरविंद पवार,सरपंच सोनाली जवळकर,उपसरपंच सुनीता शिंदेमोहन जवळकर,वाल्मिक जवळकर,प्रतीक शिंदे,दत्तात्रय जवळकर,संतोष जवळकर,पारस वाल्हेकर,दयानंद शिवरकर,शंकर जवळकर,रमेश भोंडवे,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सर्वप्रथम विश्व जवळकर यांनी शिवरायांच्या गारदने कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर अपूर्वा चंद यांनी जिजाऊ वंदना घेतली व हडपसर येथील सायली हिने गणेश वंदना नृत्याच्या द्वारे सादर केली.ग्रामीण भागात प्रथमच असे कार्यक्रम होत असल्याने लोकांमध्ये उत्साह होता.रितेश नर्सरी च्या सौजन्याने मंचाचे सुशोभीकरण करण्यात आलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *