पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)   दूरचित्रवाणी वरील धारवाहिक सी आय डी या मालिकेतील फंडा वापरून दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी एका ७० वर्षीय वयस्कर महिलेचा खून करून घरातील मौल्यवान दागिन्यासह रोख रक्कम पळवली होती यात कसलाही सबळ पुरावा नसताना देखील सिंहगड पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.

          सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि ३० ऑक्टोबर रोजी पोलीस नियंत्रण कक्षात फोनद्वारे माहिती मिळाली की हिंगणे खुर्द येथील सायली हाईट मधील फ्लॅट ७ मध्ये चोरी झाली असून एक वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत आहे यावर सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास घेवारे,गुन्हे शाखेचे प्रमोद वाघमारे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली त्यावेळी तेथे शालिनी बबन सोनवणे या निपचित पडलेल्या होत्या व घरातील कपाटे उचकटून चोरी झाल्याचे दिसून आले व हा चोरीच्या उद्देशाने खून झालेला असावा असे प्रथम दर्शनी दिसले.
          घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व तपासाच्या सूचना दिल्या जवळपास कुठेही सी सी टी व्ही नसल्याने तपासात कोणताही पुरावा सापडत नव्हता ४८ तास उलटूनही काहीच माहिती मिळत नव्हती पण अचानक त्याच परिसरात रोकडोबा मंदिराशेजारी एका लहान मुलाने तपासी अंमलदार उज्जव मोकाशी यांना सांगितले की त्याच्या दोन मित्रांनी त्यादिवशी पाणीपुरी न खाताच घाईने परतले होते त्यावर त्या दोघांना विश्वासात घेऊन चौकशी सुरू केली परंतु एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली यावर त्यांची अधिक माहिती काढली असता त्यातील एक विधिसंघर्षग्रस्त मुलगा स्वतःच्या घरात चोरी करत असल्याचे कळले.
          तपास पथकाने या दोघांकडे विश्वसात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ही चोरी व खून केल्याचे मान्य केले. चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली त्यांनी दोन महिन्यांपूर्वी सी आय डी हे धारवाहिक पाहून चोरीचा कट रचला होता.घरात कोणीही नसते केवळ वृद्ध महिला असते ती कुठे जात नसल्याने तिचा खून करण्याची तयारी त्यानी केली होती त्यानुसार ते घरात शिरले व त्या महिलेसोबत टीव्ही पाहत बसले ती म्हातारी गुंग असताना खुर्चीवरून खाली ढकलून तोंड व नाक दाबुन खून केला व कपाटातील रु ९३,००० रोख व रु ६५,५०० ची सोन्याची दागिने पळविले.ही चोरी करताना या मुलांनी बोटाचे ठसे उमटू नयेत म्हणून ग्लोज वापरले होते .
               ही कारवाई सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, पोलीस उप-निरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, सचिन माळवे,शंकर कुंभार, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, सुहास मोरे,इंद्रजित जगताप, अमोल पाटील,सागर भोसले, विकास बादंल, विकास पांडोळे,अमित बोडरे, यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *