पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे – सोलापुर महामार्गावरील उरुळी कांचन येथे दोन टोळ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात वाळू व्यावसायिक संतोष जगताप हा जागीच ठार झाला व त्याचे दोन अंग रक्षक गंभीर जखमी झाले होते या प्रत्योतरादाखल अंगरक्षकाडून केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर जागीच ठार झाला होता व अन्य दोघे पळून गेले होते लोणी काळभोर पोलिसांनी पवन मिसाळ व महादेव अदलिंगे या दोन हल्लेखोरांना पळसदेव येथून अटक केली त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्या हल्ल्याचा मुख्यसूञधार उमेश सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले.उमेश सोनवणे यास शिरुर येथून अटक केल्यानंतर पोलिस तपासात त्यांना शस्ञ पुरविणाऱ्या दोन व्यक्तीची नावे निष्पन्न झाली.
वारिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपञकात शस्ञ पुरवणाऱ्या आकाश वाघमोडे राहणार कुर्डवाडी ता.माढा जिल्हा सोलापूर व अभिजीत यादव रा.मेडद ता.बारामती यांना विशेष तपास पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन न्यायलायासमोर उभे केले असता न्यायलयाने त्यांना दि.८नाव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंखे,श्रीनाथ जाधव, संभाजी देवकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर,निखिल पवार, शैलेश कुदळे,राजेश दराडे,दिगंबर साळुंखे या पथकाने केली
